URL च्या सूचीत प्रवेश अवरोधित करा

सूचीबद्ध केलेल्या URL मधील प्रवेश अवरोधित करते.


हे धोरण काळ्‍या सूचीत समाविष्‍ट केलेल्या URL मधील वेबपृष्‍ठे लोड करण्‍यापासून वापरकर्त्यास प्रतिबंधित करते. काळी सूची कोणत्या URL ला काळ्‍या सूचीत समाविष्ट केले जावे हे निर्दिष्‍ट करणारी URL नमुन्यांची एक सूची प्रदान करते.

प्रत्येक URL नमुना हा स्थानिक फायलींसाठी किंवा सामान्य URL नमुन्यासाठी एक नमुना असू शकतो. स्थानिक फाईल नमुने 'file://path' स्वरूपनाचे असतात, ज्यामध्‍ये पथ हा अवरोधित करण्‍यासाठी एक निरपेक्ष पथ असावा. तो पथ ज्या सर्व फाईल सिस्टीम स्थानांसाठी उपसर्ग असतो ती अवरोधित केली जातील.

सामान्य URL नमुन्‍यामध्‍ये 'scheme://host:port/path' स्वरूपन असते.
सादर केल्यास, केवळ निर्दिष्‍ट केलेली स्कीम अवरोधित केली जाईल. scheme:// उपसर्ग निर्दिष्‍ट केली नसल्यास, सर्व स्कीम अवरोधित केल्या जातील.
होस्ट आवश्‍यक आहे आणि ते होस्टनाव किंवा IP पत्ता असू शकते. होस्टनावाचे सबडोमेन देखील अवरोधित केले जातील. सबडोमेन अवरोधित करणे प्रतबंधित करण्‍यासाठी, होस्टनावापूर्वी एक '.' समाविष्‍ट करा. विशिष्ट होस्टनाव '*' सर्व डोमेनना अवरोधित करेल.
पर्यायी पोर्ट ही 1 पासून 65535 पर्यंत वैध पोर्ट संख्‍या असते. काहीही निर्दिष्‍ट न केल्यास सर्व पोर्ट अवरोधित केले जातील.
पर्यायी पथ निर्दिष्‍ट केला असल्यास, केवळ तो उपसर्ग असलेले पथ अवरोधित केले जातील.

URL श्वेतसूची धोरणामध्‍ये अपवाद परिभाषित केले जाऊ शकतात. ही धोरणे 1000 प्रविष्टींपर्यंत मर्यादित असतात; त्यानंतरच्या प्रविष्‍टींकडे दुर्लक्ष केले जाईल.

लक्षात ठेवा अंतर्गत 'chrome://*' URL अवरोधित करण्‍यामुळे अनपेक्षित त्रुटी येऊ शकतात त्यामुळे हे करण्‍याची शिफारस केली जात नाही.

हे धोरण सेट न केल्यास ब्राउझरमध्‍ये कोणतीही URL काळ्‍या सूचीत समाविष्‍ट केली जाणार नाही.

Supported on: Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
URL च्या सूचीत प्रवेश अवरोधित करा

Registry HiveHKEY_LOCAL_MACHINE or HKEY_CURRENT_USER
Registry PathSoftware\Policies\Google\Chrome\URLBlacklist
Value Name{number}
Value TypeREG_SZ
Default Value

chrome.admx

Administrative Templates (Computers)

Administrative Templates (Users)